माणुसकी जपणारा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ : सभापती प्रा. राम शिंदे

कर्जत : प्रा. किरण जगताप

सभापती प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक बहिरोबावाडी येथील बंटी यादव यांना शुक्रवारी कॉल आला आणि ‘मी आपल्याकडे येतोय’ असे सांगितले अन् प्रा. शिंदे यांनी रात्री यादव यांची फार्महाऊसवर भेट घेतली. सभापती शिंदे यांनी यादव मित्रपरिवारासमवेत त्यांनी स्नेह जपला. नेत्याने अचानक भेट दिल्याने कार्यकर्त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही.

यादव परिवार आणि ग्रामस्थांच्या वतीने प्रा. राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सभापती शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यानंतर त्यांनी उपस्थितांसमवेत स्नेहभोजन केले. बंटी यादव यांच्यासाठी हा भावनिक क्षण होता. एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत असलेली व्यक्तीने सहजपणे आपुलकीने भेट दिल्याने सर्वच भारावून गेले.

कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता काय असतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रा. राम शिंदे. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना बळ देणारा नेता म्हणून प्रा. शिंदे यांची वेगळी ओळख आहे. मतदारसंघात ते साधेपणा जपत, मिळून मिसळून वागतात. लोकांच्या अडचणी समजून घेत त्यावर संवेदनशीलतेने प्रतिक्रिया देतात.

या एका भेटीने नेता आणि कार्यकर्त्याच्या नात्यातील आपुलकी, विश्वास आणि माणुसकीचे नाते पुन्हा अधोरेखित झाले. प्रा. राम शिंदे यांनी हे सिद्ध केले की राजकारण हे केवळ सत्तेचे नव्हे, तर माणसाच्या मनात घर करण्याचे एक माध्यम आहे, अशी प्रतिक्रिया बंटी यादव यांनी दिली आहे.