कोकणगावमध्ये श्री भैरवनाथ यात्रा उत्सव ; कावड मिरवणुक ते ऑर्केस्ट्रा

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त मंगळवार, दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता डीजे वाजवून कावड मिरवणूक होणार आहे. सकाळी १० वाजता सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता शेरणी वाटप होईल. रात्री ९ वाजता डीजे वाजवून छबिना मिरवणूक फटाक्यांच्या आतषबाजीसह पार पडणार आहे.

बुधवार, दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी श्री भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त भव्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शुभांजली थोरात आपली सादरीकरण करणार आहेत.

या उत्सवाचे आयोजक भैरवनाथ यात्रा उत्सव समिती व कोकणगावचे सर्व ग्रामस्थ असून, सर्व भाविक भक्तांनी या यात्रेत आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मिरजगाव येथील ओम हॉस्पिटलचे संचालक डॉ. संतोष संभाजी बोरुडे यांनी केले आहे.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी