‘राष्ट्रवादी’च्या युवक जिल्हाध्यक्षपदी पप्पूशेठ धुमाळ

कर्जत : प्रा. किरण जगताप

अहिल्यानगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संतोष उर्फ पप्पूशेठ धुमाळ यांची युवक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

दि. २३ एप्रिल रोजी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, विधान परिषदेचे आ. शिवाजीराव गर्जे व प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी अहिल्यानगरचे उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार- पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र काका गुंड, राष्ट्रवादी काँग्रेस नेते संजय कोळगे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष अमर पाटील, प्रदेश सरचिटणीस रणजीत नरोटे, प्रदेश उपाध्यक्ष फारुखभाई, नवनियुक्त सरचिटणीस नंदुभाऊ मुंडे, उद्योजक व पै. धीरज रसाळ पाटील तसेच इतर अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

निवडीनंतर पप्पूशेठ धुमाळ म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यात युवकांचे संघटन बळकट करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी सक्रिय काम करीन. माझे नेते सुरज चव्हाण यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी दिली आहे, ती योग्यरीत्या पार पाडण्याचे वचन मी देतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मी कट्टर समर्थक असून, गेल्या अनेक वर्षांपासून युवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. मला प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाल्याचे मी माझे भाग्य समजतो.

‘गाव तेथे शाखा, गाव तिथे राष्ट्रवादी’ हे ध्येय बाळगून आणि २०% राजकारण, ८०% समाजकारण’ या तत्वावर काम करत, संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार मी व्यक्त करतो, असे पप्पूशेठ धुमाळ यांनी सांगितले.

या निवडीबद्दल आ. संग्रामभैया जगताप, आ. काशिनाथ दाते, आ. शिवाजीराव गर्जे, आमदार चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, कर्जत तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष भगवानराव पाचपुते, जामखेड तालुका अध्यक्ष महेश निमोणकर, सचिन गायवळ, युवक अध्यक्ष सुरज रसाळ आदींनी पप्पूशेठ धुमाळ यांचे अभिनंदन केले.