
आम आदमी पार्टीची राज्यस्तरीय आढावा बैठक आज पुणे येथे पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महेश सटाले यांची आम आदमी पार्टीच्या अहिल्यानगर युवा कार्यकारी जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.

या प्रसंगी महाराष्ट्राचे प्रभारी प्रकाश जरवाल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित फाटके, पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दात, जिल्हाध्यक्ष राजुभाऊ आघाव,उपनगराध्यक्ष संजय सुखदान तसेच तालुका अध्यक्ष ॲड. सादिक शिलेदार उपस्थित होते.

याशिवाय प्रवीण तिरोडकर, उत्तम पाटील, आरटीआय कार्यकर्ते कुंभार सर, तालुकाध्यक्ष संतोष नवलखा, राजेंद्र सटाले, बाळासाहेब साळवे तसेच पक्षाचे इतर राज्यस्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नियुक्तीनंतर महेश सटाले यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन अधिक बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार करून युवकांना मोठ्या प्रमाणावर पक्षात जोडण्याचा संकल्प व्यक्त केला.


