
लोककल्याण बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रविण अडसूळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. खादी ग्रामोद्योग कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन अमृत उद्योग समूहाचे अहिल्यानगर प्रमुख अविनाश अडसूळ व आदित्य फर्निचरचे सर्वेसर्वा अतुल धांडे यांनी केले होते.

या वाढदिवस सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून खादी ग्रामोद्योग समूहाचे चेअरमन रोहनभाऊ कदम उपस्थित होते. तसेच प्रा. दादा समुद्र, राहुल अडसूळ, काकासाहेब सरोदे, शिरीष भैलुमे आणि गणेश साउंड सिस्टीमचे नितीन थोरात यांची विशेष उपस्थिती लाभली.

सध्या परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने सामाजिक भान जपत हार-तुरे, फेटे व इतर अनावश्यक खर्चाला फाटा देण्यात आला. त्याऐवजी केवळ केक कापून आणि उपस्थित मान्यवरांसोबत आपुलकीने हितगुज करत वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला.
साधेपणातून सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष कौतुकाचा विषय ठरला. यावेळी उपस्थितांनी प्रविण अडसूळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

