
मेहनत, जिद्द, सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर बागल सर्विसेसने आरोग्य विमा क्षेत्रात पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
केअर हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून आयोजित सिंगापूर इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी बागल सर्विसेसच्या पाच हेल्थ प्लॅनर्सनी पात्रता मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
ज्ञानेश्वर बागल, सचिन गाडे, सागर डाळिंबे, बापूसाहेब मांडगे आणि सागर सोनमाळी हे सर्व हेल्थ प्लॅनर्स सिंगापूर इंटरनॅशनल कॉन्फरन्स साठी क्वालिफाय झाले आहेत. सातत्यपूर्ण मेहनत, ग्राहकांचा विश्वास आणि व्यवसायाप्रती असलेली निष्ठा यामुळे या सर्वांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कंपनीचे सीईओ यांनीदेखील विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बागल सर्विसेसचे प्रमुख महेंद्र बागल यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेले हे यश संपूर्ण टीमसाठी अभिमानास्पद असून इतर सहकाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. या सर्व पात्र हेल्थ प्लॅनर्सचे बागल सर्विसेस परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा



