कर्जत : प्रा. किरण जगताप

आजच्या काळात युवकांनी, व्यावसायिकांनी तसेच नोकरदार वर्गाने आपल्या वेळेनुसार हेल्थ इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स व्यवसायाकडे जोडधंदा म्हणून वळावे असे आवाहन महेंद्र बागल यांनी केले आहे. या व्यवसायातून आर्थिक उत्पन्न मिळवण्याची संधी तर आहेच परंतु त्याचबरोबर समाजातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना संकटाच्या काळात मोठा आर्थिक आधार देण्याचे समाधानही मिळते. एखाद्या कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यास लाखो रुपयांच्या हॉस्पिटल बिलांमुळे संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडू शकते. अशा वेळी योग्य हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी त्यांच्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक संकटापासून वाचवू शकते.

महेंद्र बागल व बागल सर्विसेसच्या माध्यमातून इच्छुक युवक, व्यावसायिक आणि नोकरदार वर्गाला या क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. बागल सर्विसेसच्या माध्यमातून ग्राहकांना योग्य मार्गदर्शन, पॉलिसीची माहिती आणि क्लेम प्रक्रियेमध्ये मदत देण्याचा प्रयत्न केला जात आहे. क्लेम प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास त्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. ग्राहकांना योग्य सेवा मिळावी आणि विम्याचा खरा फायदा गरजेच्या वेळी मिळावा यासाठी बागल सर्विसेस कटिबद्ध आहे.

व्यवसायातून आर्थिक प्रगतीसोबतच समाजसेवेची संधी मिळत असेल तर प्रत्येक युवकाने या क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे असे महेंद्र बागल यांनी आवाहन केले. हेल्थ इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स क्षेत्रात जोडधंदा म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या युवक, व्यावसायिक आणि नोकरदार वर्गाने बागल सर्विसेसशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.