
कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील चापडगाव रोड लगत असलेल्या तिरुपती हार्डवेअर समोरील प्रांगणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त शनिवार, दि. ३१ मे २०२५ रोजी श्रीक्षेत्र चोंडी येथे येणाऱ्या सर्व अहिल्याप्रेमींना थंडगार मठ्ठा व फिल्टर पाण्याचे आयोजन सभापती राम शिंदे समर्थक, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निळकंठ शेळके व पैलवान अजित शेळके यांनी केले आहे.

निळकंठ शेळके यांनी सुरू केलेल्या कोरेगाव मधील स्वागताचे ४ थे वर्ष असून आपण या थंडगार मठ्ठा आणि फ़िल्टर पाण्याचा अवश्य लाभ घ्यावा असे त्यांनी सर्वांना नम्र आवाहन केले आहे.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी