मुख्याध्यापक संघातर्फे सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुका मुख्याध्यापक संघातर्फे सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ सोमवार दि. २ जून २०२५ रोजी पंचायत समिती शिक्षण विभाग व कर्जत तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

चिंचोली काळदात येथील स्वानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव चांडे, बेनवडी येथील श्री हरिनारायण विद्यालयाचे मुख्याध्यापक त्रिंबक निकत, रवळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक रामकृष्ण मोरे आणि शिंपोरा येथील श्रीरंग बापू मोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब गायकवाड या सर्व मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. या सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या प्रदीर्घ सेवेतून अतिशय सुंदर काम करून शैक्षणिक विकास करण्यास योगदान दिले. त्यांच्या सेवेत विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव काम केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड तसेच सोमनाथ गोपाळघरे व इतर अधिकारी आणि कर्जत तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, सचिव काकडे, तज्ञ मुख्याध्यापक राऊत, राजकुमार चौरे, मोमीन, बेरगळ आणि बाळासाहेब दाते, दीपक भोसले व इतर सन्मानित तालुक्यातील मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

या सर्व गुरुवर्यांना मुख्याध्यापक संघाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा दिल्या व सेवानिवृत्तीनंतरच्या आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्यासाठी व राहून गेलेल्या स्वप्नपूर्तीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी