
देशभरातील पवित्र तीर्थस्थळांचा जीर्णोद्धार आणि प्रांतात सुशासन व न्यायव्यवस्था प्रस्थापित करणाऱ्या पराक्रमी अहिल्यादेवींचे चोंडी जन्मस्थान विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य मंत्रिमंडळानेही चोंडीसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर केला आहे. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोंडीचा कायापालट करण्याची मुहूर्तमेढ रोवली जात असल्याने हा कर्जत जामखेडकरांचा एक प्रकारे गौरव असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन शांतीलाल कोपनर यांनी केले.

चोंडी येथे नुकत्याच आयोजित केलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चोंडी व तेथील परिसराच्या विकास कामासाठी ६८३ कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार आता या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे.

सुदर्शन कोपनर म्हणाले चोंडीच्या विकासाबरोबर अहिल्यादेवींच्या स्मृतींना मानवंदना देण्यासाठी थेट मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन चोंडी येथे करून राज्य व केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टीने सर्वधर्मसमभाव व हिंदू संस्कृतीचे महत्व अबाधित ठेवले.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी