
कर्जत तालुक्यातील राशीन येथील करमाळा रोडलगत, महालक्ष्मी हॉटेल या नव्याने सुरू होणाऱ्या व्यवसायाचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार, २ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

या हॉटेलचे संचालक पैलवान बाळासाहेब कानगुडे आणि पैलवान प्रशांत काळे यांनी नागरिकांच्या सेवेसाठी हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे.

महालक्ष्मी हॉटेलमध्ये सर्व प्रकारच्या शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांची चविष्ट डिशेस उपलब्ध असतील. याशिवाय लॉजिंगची सोय देखील करण्यात आली असून, त्यामध्ये एसी व डिलक्स रूम्स उपलब्ध असतील. त्यामुळे कर्जत तालुक्यातील नागरिकांना आणि प्रवाशांना उच्च दर्जाची सेवा एका ठिकाणी मिळणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी संचालक बाळासाहेब कानगुडे आणि प्रशांत काळे यांनी सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी