वाघोलीचा श्लोक वारे राज्य बाल अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत तृतीय

कर्जत : प्रा. किरण जगताप

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाच्या मान्यतेने पहिली बाल राज्य अजिंक्य पद कुस्ती स्पर्धा श्री छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.

राज्यभरातून या स्पर्धेमधे १४ वर्षे वयोगट व त्याखालील आणि २२,२८,३१ किलो वजन अट असलेले पैलवान सहभागी झाले होते. यामध्ये वाघोली येथील पैलवान श्लोक संदीप वारे याने ३१ किलो वजन गटातील स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला आहे. पैलवान श्लोक वारे हा जाणता राजा कुस्ती केंद्र लोणिकंद या ठिकाणी वस्ताद संदीप आप्पा भोंडवेआणि वस्ताद संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

पैलवान श्लोक वारे यांनी मागील वर्षात तालुका व जिल्हा स्तरावर मानाच्या कुस्ती स्पर्धेत विजय मिळवला आहे. राज्यभरातून आलेल्या दिग्गज स्पर्धकांमधून तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल पैलवान श्लोक याच्यावर जिल्हा व राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी