संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार दि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी लागणार आहे. महाराष्ट्रातील चर्चेत असणाऱ्या कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात काटे की टक्कर झालेली आहे.
उद्या मतमोजणी होणार असली तरी निकालापूर्वीच मतदारसंघात लोणी मसदपूर येथील रोहित पवार यांचे कट्टर समर्थक विजय कटारे यांचे आमदार रोहित पवार यांचे विजयाचे फ्लेक्स झळकले आहेत.
या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने नेमका कोणाला धक्का बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता चौका चौकात कोण विजयी होईल याच्या चर्चांना उदान आले आहे. लोकांच्या पैंजा लागले आहेत आहेत. आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित होणार असल्याचे गृहीत धरून कर्ज जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांचे ठिकठिकाणी झळकले आहेत. निकाला अगोदरच फ्लेक्स झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी