कर्जतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भास्कर भैलूमे मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले.

या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, नगराध्यक्ष उषा राऊत, नगरसेवक भास्कर भैलूमे, समन्वयक रावसाहेब धांडे, विशाल म्हेत्रे, प्रतीक ढेरे, अंकुश भैलूमे, किरण नेवसे, प्रतिभा भैलूमे, चैत्राली भैलूमे, विशाल काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रवीण घुले म्हणाले, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आज प्रत्येक घटकाला न्याय आणि समानता प्राप्त झाली आहे. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा दाखवत आहेत.

नगराध्यक्ष उषा राऊत यांनीही बाबासाहेबांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. नगरसेवक भास्कर भैलूमे यांनी मंडळाच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक संदेश देणारे भाषण, आणि सामूहिक अभिवादन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाची आयोजन व्यवस्था भास्कर भैलूमे मित्र मंडळाने केली होती. परिसर फुलांनी सजवण्यात आला होता आणि जयभीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.