
कर्जत तालुक्यातील खेड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्राचार्य डॉ. दिलीपसिंह निकुंभ यांनी मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यवैभव आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित केला. प्रा. शिवगुरु व्हंडकर यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या जतन व संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहूराव पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप काळे यांनी केले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




