
धालवडी- राक्षसवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी धालवडी येथील रमेश गहिनीनाथ पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड तालुका दूध संघाचे चेअरमन व मार्केट कमिटीचे संचालक मंगेश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

रमेश पवार यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ व सोसायटी सदस्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या माध्यमातून सोसायटीच्या कामकाजाला अधिक गती मिळेल तसेच शेतकरी व सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी धालवडीचे सरपंच पोपटराव पवार, उपसरपंच तात्यासाहेब चव्हाण, सोसायटीचे सचिव सतीश सुद्रिक, विजय पावणे, चेअरमन मोहन सुपेकर, देविदास कोपनर, सिताराम कोपनर, विठ्ठल कोपनर, बाळू काळे, अंकुश कोपनर, भालचंद्र जगताप, राजेंद्र सोलनकर, बापूराव सुपेकर, विजय कांबळे, शेखर खोडवे, अशोक खोडवे, कांतीलाल पवार, संदीप पवार, बाबासाहेब चव्हाण, प्रशांत औटे, वाल्मीक पवार, हरिभाऊ पवार, संजय खोडवे, सुरेश खोडवे आदी उपस्थित होते. या सर्वांनी रमेश पवार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी


