
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘कर्जत लाईव्ह’च्या वतीने तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत तालुक्यातील विद्यालयांमध्ये आठवी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. स्पर्धकांनी आडवा कॅमेरा धरून शांततामय वातावरणात ३ ते ५ मिनिट कालावधीपर्यंतच्या भाषणाचा व्हिडिओ तयार करून ७०३०९५२२७५ या व्हाट्सअप नंबरवर पाठवावा. सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५ ही व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख आहे.

या स्पर्धेचा निकाल शिवजयंतीदिनी, १९ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘कर्जत लाईव्ह’वरुन जाहीर केला जाणार आहे. प्रथम ३ क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक बक्षिसे व प्रशस्तीपत्रक वितरित केली जाणार आहेत. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही ‘कर्जत लाईव्ह’ची प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांनी १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत karjatlivenews@gmail.com या ई- मेल आयडीवर आपले पूर्ण नाव, इयत्ता, शाळेचे नाव आणि मोबाईल नंबर ही माहिती पाठवून नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ९३७०८६५०९७ (राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी ) या नंबरवर संपर्क साधावा.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पुढीलपैकी एका विषयावर वक्तृत्व सादर करायचे आहे :
१) शिवरायांचे बालपण आणि जिजाऊंचे संस्कार, २) शिवाजी महाराज आणि स्वराज्य संकल्पना ३) शिवाजी महाराजांची गनिमी कावा युद्धनीती ४) शिवरायांचे मावळे : स्वराज्यासाठी लढणारे शिलेदार ५) शिवरायांचे प्रशासन आणि न्यायव्यवस्था ६) शिवचरित्रातून आजच्या तरुणांनी काय शिकावे?