शिवजयंतीनिमित्त कर्जत शहरात विविध उपक्रम ; जोरदार तयारी सुरु

कर्जत : प्रा. किरण जगताप

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कर्जत येथे भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, कर्जत येथे हा सोहळा पार पडणार आहे.

या उत्सवात मर्दानी खेळ, ढोल पथक, मिरवणूक रथ, नटराज बँड, विंचुर बँड, लेझीम पथक, भजनी मंडळ, हलगी पथक अशा विविध आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने कर्जतमध्ये शिवभक्तांची मोठी उपस्थिती राहणार आहे.

या सोहळ्याचे आयोजन सकल मराठा समाज, कर्जत तालुका यांनी केले आहे. आयोजकांकडून उत्सवाची जोरदार तयारी सुरू असल्याने कर्जत शहरात उत्साहाचे वातावरण आहे. शिवप्रेमींसाठी हा सोहळा एक पर्वणी ठरणार आहे.