माऊली पेट्रो स्टेशनमध्ये फ्री नायट्रोजन सेवा उपलब्ध

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत- राशीन रोडलगत नव्याने सुरू केलेल्या माऊली पेट्रो स्टेशनचे संचालक अक्षय राऊत यांनी ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर सुरु केली आहे. या पेट्रो स्टेशनमध्ये फ्री नायट्रोजन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कर्जत शहरात व इतर ठिकाणी नायट्रोजनचे प्रती चाक १० ते २५ असा दर आकारला जातो. मात्र, माऊली पेट्रो स्टेशनमध्ये पेट्रोल व डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नायट्रोजनची सेवा फ्रीमध्ये देण्यात येणार आहे. आता उन्हाळा चालू होत असल्याने तापमान वाढत आहे. तापमान वाढल्यामुळे टायर फुटणे, टायर लवकर खराब होणे, मायलेज कमी देणे असे अनेक तोटे साध्या हवेमुळे होतात. त्यामुळे नायट्रोजनचा वापर करणे गरजेचे असते.

नायट्रोजन वापरल्याचे विविध फायदे आहेत.
टायरचे तापमान कमी राहते, उन्हाळ्यात टायर फुटीचे प्रमाण कमी होते. नायट्रोजन वापरामुळे मायलेजमध्ये वाढ होते व टायरचे आयुष्य वाढते. डिस्क, मोक्वील व रिमचे आयुष्य वाढते आणि सस्पेन्समध्येही वाढ होते.

त्यामुळे माऊली पेट्रो स्टेशनचे संचालक अक्षय राऊत यांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे. एचपी म्हणजे शुद्धता, एचपी म्हणजे मायलेज, इतर पंपाच्या तुलनेत २० ते ५० रुपये कमी दराने कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच डीटीपी कार्ड सुविधा उपलब्ध आहे आणि ऍड ब्ल्यू व ऑईल कमी दरात उपलब्ध केले आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राहुल अडसूळ, तालुका प्रतिनिधी