
कर्जत तालुक्यातील आदिवासी भिल्ल, भटक्या विमुक्त जाती जमाती या समाजाचे लोक शासनाच्या जागेत सुमारे ५० ते ६० वर्षांपासून राहत आहेत. त्यांना निवाऱ्याची सोय नाही. हे लोक अनेक दिवसांपासून कच्च्या घरामध्ये राहत आहेत त्यांचे अतिक्रमण नियमित करून त्यांना शासनामार्फत पक्की घरे व इतर सुविधा मिळाव्यात तसेच त्यांच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात आणि त्यांना पक्क्या स्वरूपाचे घरकुल मिळावेत, या मागणीसाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे गावठाण जागेवर व शासनाच्या गायरान जमिनीवर अळसुंदे, बेनवडी, गुरव पिंपरी, मिरजगाव, चापडगाव, निमगाव डाकू, रुईगव्हाण व तालुक्यातील इतर ठिकाणी सध्या रहात असलेल्या जागेवर मालकी सदरील नोंद होऊन त्यांच्या नावे सातबारा उतारा व नमुना नंबर ८ अ दाखल करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यास आपल्या स्तरावरून आदेश द्यावेत आदी मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हे निवेदन देण्यात आले.
यावेळी कोरेगावचे माजी उपसरपंच उदयसिंग राजपूत, एकलव्य संघटनेचे जिल्हा सचिव सोमनाथ गोरे व इतर पदाधिकारी सतीश शिंदे, संदीप बर्डे, संजय बर्डे, संभाजी साळुंखे, भाऊ माळी, दत्ता बर्डे, बाबासाहेब बर्डे, सागर बर्डे आदी उपस्थित होते.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी