‘तनिष्का वर्ल्ड’ व्यवसायाचा पाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत येथील कुळधरण रोडलगत जगदंबा फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स संचलित तनिष्का वर्ल्ड या नूतन व्यवसायाच्या भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रविवार दि. ३० मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

या दुकानात सर्व प्रकारचे गिफ्ट, क्रॉकरी, टॉईज, फ्रेम्स, होम डेकोरेशन, बॅग, स्पोर्ट्स आणि स्टेशनरी इमिटेशन ज्वेलरी तसेच सर्व प्रकारच्या बॅटरी ऑपरेट किड्स बाईक आणि कार उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्राहकांना सोयीस्कर खरेदी करता येणार असून, या सुविधेचा त्यांना पूर्ण लाभ घेता येणार आहे.

या व्यवसायाचे उद्घाटन आई वडील यांच्या हस्ते व सर्व मित्र परिवार तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी संतराम ज्ञानदेव गांगर्डे, संगीता संतराम गांगर्डे, राहुल संतराम गांगर्डे आणि प्रियंका राहुल गांगर्डे यांनी या उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी