
कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील दादासाहेब माणिक अडसूळ यांचे चिरंजीव विठ्ठल दादासाहेब अडसूळ यांची आयबीपीएस २०२४ मार्फत घेण्यात आलेल्या इंडियन बँक सी. एस.ए. पदी निवड झाली आहे.

विठ्ठल अडसूळ दहावीमध्ये शिकत असताना त्यांना प्रमोद भैलुमे सरांचे मार्गदर्शन लाभले. बँकिंग परीक्षेचा अभ्यास २०२२ ते २०२५ या कालावधीमध्ये केला असून त्यात ६२ पूर्व परीक्षा, १७ मुख्य परीक्षा आणि ५ मुलाखती इतक्या अथक परिश्रमानंतर त्यांना हे यश मिळाले. विठ्ठल हा सरकारी सेवेत असावा असे कुटुंबातील प्रत्येकाचे स्वप्न होते. अखेर त्याने खूप मेहनत करून कुटुंबीयांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.

दादासाहेब अडसूळ वडील आणि उषा अडसूळ आई शेतकरी असून अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटल येथे सीनियर मेडिकल ऑफिसर डॉ. दिपाली राजू थोरात या मोठी बहीण तर शिक्षिका सोनाली हरी खरात या छोटी बहीण तर अमृत हर्बलचे चीप मॅनेजिंग डायरेक्टर अविनाश अडसूळ हे मोठे भाऊ आणि बालरोग तज्ञ डॉ. राजू रमेश थोरात हे दाजी या सर्वांचा विठ्ठलला खूप पाठिंबा होता.

विठ्ठल अडसूळ यांची निवड झाल्यामुळे त्यांचे कोरेगाव मध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी