
श्री. वसंत जोशी, तारांगण सोसायटी, पुणे यांच्यातर्फे कर्जत तालुक्यातील खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयातील हुशार, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी १००० रुपयांची मदत देण्यात आली. इयत्ता पाचवी ते नववी या प्रत्येक वर्गातील एक मुलगा व एक मुलगी यांना एकूण २०००० रुपये मदत प्रदान करण्यात आली. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. प्रवीण सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

९० वर्षीय वसंत जोशी यांनी यावेळी, जिवंत असेपर्यंत आपल्या वतीने आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संस्थेचे विश्वस्त आप्पा अनारसे, रमा सप्तर्षी, माजी पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब बाळासाहेब मोरे, मुख्याध्यापक गोरक्ष भापकर व विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी, शैक्षणिक संकुलातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन भिसे सर यांनी केले, तर आभार गावडे सर यांनी मानले.

