चॉईस हायड्रोलिक्स या फर्मचे शुक्रवारी राशीनमध्ये उद्घाटन

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील राशीन येथे सुरेश कानडे यांच्या चॉईस हायड्रोलिक्स या फर्मचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. ११ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. नागेश्वर पार्क, नागेश्वर मंदिराजवळ, राशीन – कर्जत रोड, राशीन येथे ही फर्म सुरु होत आहे.

चॉईस हायड्रोलिक्स या फर्ममध्ये सीओटू वेल्डिंग, बकेट हार्डीग, बुम स्टिक क्रॅक रिपेरिंग, ब्रेकर, मशीन स्विंग मोटर, सर्व प्रकारचे ऑइल सील बदलणे व रिपेरिंगची सर्व कामे खात्रीशीरपणे केली जातील. तसेच साइटवर येऊन कामे केली जातील. एवढेच नाही तर जेसीबी, पोकलेनची सुद्धा सर्व कामे खात्रीशीरपणे केली जातील. त्यामुळे ग्राहकांना सर्व कामे सोयीस्कर करता येणार असून या सुविधेचा त्यांना पुरेपूर लाभ घेता येणार आहे.

या फर्मचे उद्घाटन संचालक सुरज सुरेश कानडे, राशीनचे ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल विकास मोढळे आणि समस्त कानडे परिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक सुरेश कानडे आणि सांगलीचे उद्योजक विलास गेळे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक सुरेश कानडे यांनी केली आहे.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी