
कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी देशभक्तिपर गीत, शेतकरी गीत, कोळी गीत, गोंधळ गीत, समाजप्रबोधनपर व विनोदी नाटिका, तसेच विविध नृत्य आदी कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन भांबोरा गावच्या सरपंच विद्याताई जगताप, उपसरपंच दीपक लोंढे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश लोंढे, उपाध्यक्ष सचिन माने, सदस्य दत्तात्रय हिरभगत, रामहरी लोंढे, सुहास लोखंडे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष संदीप बळे, शरद कुंभार, हनुमंत देशमाने, रामदास फरांडे आणि सोनालीताई लोंढे यांच्या उपस्थितीत पार पडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले कार्यक्रम पाहून गावकऱ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष औदुंबर जगताप, माजी उपाध्यक्ष संदीप बळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, भांबोरा केंद्रातील शिक्षक प्रवीणकुमार भोसले, राजेंद्र लोंढे, अमोल रसाळ, अमोल शेकडे, मंगेश काळे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि पालकांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय मिसाळ यांनी तर सूत्रसंचालन अमोल हुमे व दीपाली बेलेकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे कौतुक म्हणून ग्रामस्थांकडून शाळेसाठी ८२ हजार रुपये बक्षीस म्हणून जमा करण्यात आले.