
जामखेड तालुक्यातील कवडगाव–गिरवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये मागील पाच वर्षांतील कथित भ्रष्टाचाराची मोठी पोलखोल झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. कवडगावचे तत्कालीन ग्रामसेवक फरतडे भाऊसाहेब तसेच सध्याचे ग्रामसेवक रोमाडे यांच्यावर या कथित भ्रष्टाचाराची जबाबदारी असल्याचे गंभीर आरोप ग्रामस्थांनी केले आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार विविध विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झालेला असून त्याची सविस्तर यादी ग्रामसभेत वाचून दाखवण्यात आली. त्यामध्ये पुढील कामांचा समावेश आहे. झेडपी गिरवली शाळा पाणीपुरवठा करणे ६०९८ व ११३७२२ एलईडी टीव्ही खरेदी करणे ९१५५० कचरा गाडी खरेदी करणे १००००० कचरा कुंड्या खरेदी करणे ८७६२० सार्वजनिक आड दुरुस्ती ५००० आणि ९९००० बुद्ध अनुदान २५५३५३ स्मशानभूमी सुशोभीकरण २ लाख गायरान विहीर दोस्ती करणे १ लाख १०० नळ कनेक्शन ३ लाख गिरवली मंडलीक वस्ती स्टेट लाईट ४९९६२९ गिरवली पाणी फिल्टर रूम बांधणे ९९८१० ग्रामपंचायत कवडगाव सांगळे वस्ती स्टेट लाईट बसविणे ४ लाख पाणी फिल्टर कवडगाव ४४७००० कवडगाव घनकचरा शोषखड्डे बांधणे सांडपाणी ४४७०९० आणि ग्रामपंचायत दुरुस्ती १४६००० रू

दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे कवडगाव व गिरवली या दोन्ही गावांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून लवकरात लवकर चौकशी समिती नेमण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने या गंभीर आरोपांची दखल घ्यावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.




