उपअभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर केसकर यांचे उपोषण मागे

कर्जत : प्रा. किरण जगताप

आश्वासन पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलन करणार : केसकर

कर्जत तालुक्यातील तरडगाव येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली. या योजनेसाठी शासनाकडून ७७ लाख रुपयांची योजना मंजूर करण्यात आली परंतु या योजनेचे काम चालू करताना जिल्हा परिषद व पंचायत समिती ठेकेदार यांच्या साखळी पद्धतीने हे काम अगदी निकृष्ट पद्धतीने करण्यात आले आहे. यासाठी कर्जत पंचायत समितीसमोर वैजिनाथ केसकर यांनी आमरण उपोषण केले. उपअभियंता यांनी ३० दिवसांमध्ये मागणी पूर्ण केली जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

ही योजना पूर्ण होऊन एक ते दीड वर्ष झाले तरी देखील मोदी सरकारच्या घोषणे प्रमाणे हर घर हर नळ याप्रमाणे गावातील कोणत्याही ग्रामस्थांच्या घरी नळ नाही व नळाला पाणीही गेले नाही यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे या करता आज तरडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वैजीनाथ केसकर यांच्या वतीने कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात आले. या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण आबा जाधव, शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष सोमनाथ शिंदे, संतोष चव्हाण, सरपंच शरद देवकाते, तुकाराम पवार, रामदास देवमुंडे, शुभांगी गोहेर, शितल काळे, डिसेना पवार तसेच सामाजिक संस्था संघटना आदीनी पाठिंबा दिला आहे.

ही योजना राबवताना ग्रामपंचायतीचा कोणताही संबंध ठेवला नाही ग्रामपंचायतने केवळ योजना पूर्णत्वाचा दाखला देणे एवढेच काम ग्रामपंचायतकडे ठेवले आहे त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर ती तक्रार करताच येत नाही.
ही योजना चालू असताना केसरकर व गावकऱ्यांनी संबंधित पाणीपुरवठा विभागाचे अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व गटविकास अधिकारी यांच्याकडे अनेक वेळेस तोंडी व लेखी तक्रार देखील केली आहे कारण ठेकेदार व अधिकारी यांची साखळी असल्याने त्यांनी गावातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकऱ्यांना व आम्हाला कोणालाच विचारात न घेता ही योजना निकृष्ट दर्जाची पूर्ण केली आहे. या योजनेची चौकशी केल्याशिवाय संबधीत ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येऊ नये असे प्रशासनास लेखी पत्र दिले असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारांचे संपूर्ण बिल आदा करण्यात आले आहे.
या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप वापरले आहेत खोदकाम साधारण एक ते दीड फुटापर्यंत केले आहे. पीडब्ल्यूडी परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्याच्या मध्यभागातून पाईप गाढले आहेत विहिरीची खोदाई, ट्रायल बोर, रुंदी, मोटर घर, इलेक्ट्रिक मोटर इत्यादी कोणतेचं काम अंदाज पत्रकारानुसार केलेले नाही. त्यामुळे या योजनेचे काम झाल्यापासून ते आजपर्यंत गावातील योजनेचे पाणी कोणत्याच गावकऱ्यांच्या घरामध्ये गेले नाही मग ही योजना कशाकरता राबविण्यात आली होती या सर्व कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून संबंधित अधिकारी ठेकेदारी वरती कार्यवाही करण्यात यावी व या योजनेचे पाणी प्रत्येक घरामध्ये गेलेचं पाहिजे याकरता वैजीनाथ केसकर व गावकऱ्यांनी कर्जत पंचायत समिती समोर उपोषण केले होते तेव्हा गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.
परंतु या योजनेची चौकशी करून घरांमध्ये पाणी न गेल्यास मी पुन्हा गावकऱ्यांसमवेत उपोषणास बसणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. कारण आमच्या गावाला परत पन्नास वर्षे पाणीपुरवठा योजनेसाठी शासनात स्तरावरून कोणताच निधी दिला जाणार नाही यासाठी आत्ता नाही तर परत नाही या घोषवाक्य प्रमाणे आमच्या हक्काचा वा अधिकाराच्या पैशावरती ज्या ठेकेदार व अधिकारी यांनी डल्ला मारला आहे त्यांना शासनाने कठोरातील कठोर शिक्षा करावी ही गावकऱ्यांची भूमिका आहे कारण हा उघड उघड डोळे झाक पणे महाभयंकर भ्रष्टाचार आहे.