
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती पदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा करत आ. राम शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, ‘जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व अशी आ. प्रा. राम शिंदे यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देत विधान परिषदेचे कामकाज सुरळीत व शिस्तबद्ध पार पाडण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
आ. राम शिंदे यांच्या निवडीने महायुतीतील नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून विधान परिषदेच्या कामकाजावर सकारात्मक प्रभाव पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कार्यक्षम नेतृत्वाची छाप पाडणाऱ्या आ. शिंदे यांची ही निवड आगामी काळात महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या निवडीमुळे कर्जत- जामखेड मतदारसंघात आनंदाचे वातावरण पसरले आहे.