कर्जतमध्ये प्रवीण घुलेंनी केली गोदड महाराजांच्या मूर्तीची स्थापना

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या मूर्तीची स्थापना (सदगुरू याग) मोठ्या भक्तिभावाने पार पडली. या मंगलप्रसंगी पै. प्रवीण घुले पाटील यांच्या हस्ते मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली.

यावेळी धार्मिक विधी व महापूजा सोहळा थाटामाटात पार पडला. मंदिरात उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर, भक्तगण आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.

पै. प्रवीण दादा घुले पाटील यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना गोदड महाराजांच्या अध्यात्मिक विचारांचा आणि त्यांच्या जीवनकार्याचा जीवनपट सांगितला तसेच त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

तसेच २५ डिसेंबर रोजी विठ्ठल- रुक्मिणी मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त हरी किर्तन सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी वारकरी सेवा प्रतिष्ठान आणि मंदिर समितीने विशेष प्रयत्न केले. हा सोहळा भक्तांसाठी अध्यात्मिक उर्जा आणि प्रेरणेचा स्रोत ठरला.