सभापती प्रा. राम शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये सामाजिक उपक्रम

कर्जत : प्रा. किरण जगताप

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कर्जत येथे भव्य महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गंगाई हॉस्पिटल व विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून हे शिबिर घेण्यात येत आहे. शिबिराचे हे दहावे वर्ष आहे. बुधवार, दि. १ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कुळधरण रोड, कर्जत येथील विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे हे शिबिर होणार आहे.

या शिबिरामध्ये नाव नोंदणी केलेल्या नागरिकांना बीपी, शुगर, ईसीजी अशा तपासण्या, दुर्बिणीद्वारे होणारी विविध ऑपरेशन्स जसे की पिशवीचे ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, टॉन्सिल, तसेच नाकाची वाढलेली हाडे काढणे, महिलांसाठी डिलिव्हरी व सिजेरियन ऑपरेशन, तसेच नसबंदी ऑपरेशन हे सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत.

या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांसह सर्जन डॉ. अक्षय शिवाजी गोरे हे जॉईन झालेले आहेत. कर्जतमध्ये उपलब्ध असलेले ते एकमेव सर्जन आहेत. रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास एमडी मेडिसिन शुगर, बीपी, दमा, हृदयरोग तज्ञ उपलब्ध असलेल्या या हॉस्पिटलची तालुक्यात वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.

नागरिकांनी या हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांच्या आयोजक टीमने केले आहे. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी ९९७०४००४१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.