पत्रकार गणेश जेवरे, पत्रकारांचा भांडाफोड कधी करणार ?

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील पत्रकारांमध्ये वयाने काहीसे ज्येष्ठ असलेल्या आणि कर्जत शहरात राहणाऱ्या पत्रकार गणेश जेवरे यांनी जी न्यूजच्या माध्यमातून ‘नसीर हुसेन सय्यद नावाचा कर्जतमधील ब्लॅकमेलर’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली. या बातमीमध्ये त्यांनी प्रतिष्ठित लोकांच्या नावाने खोट्या तक्रारी देऊन त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा धंदा सुरू असून त्याचा म्होरक्या नसीर सय्यद असल्याचे म्हटलेले आहे. सय्यद हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत असेही नमूद करत त्यांच्यावर जेवरे यांनी आणखी गंभीर आरोप केले.

त्यासोबतच जेवरे यांनी बातमीमध्ये सय्यद हे ब्लॅकमेल करणाऱ्या पत्रकारांना हाताशी धरून हे उद्योग करत असल्याचे म्हटले. अशा पद्धतीने पैसे घेऊन ब्लॅकमेलिंग व्यवसाय करणाऱ्या पत्रकारांचाही भांडाफोड करणार असल्याचे जेवरे यांनी बातमीत म्हटलेले आहे.

मात्र बातमी प्रसिद्ध होवून तीन दिवस उलटूनही पत्रकार गणेश जेवरे यांनी पत्रकारांचा पर्दाफाश करणारी बातमी अथवा ब्लॅकमेल करणाऱ्या पत्रकारांचे पुरावे जाहीरपणे मांडल्याचे दिसत नाही.

नसीर सय्यद यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायावर भाष्य करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेसाठी कर्जतमधील ४ पत्रकार उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर गणेश जेवरे यांनी पत्रकारांना ब्लॅकमेलर म्हणत ही बातमी प्रसिद्ध केलेली आहे.

पत्रकारांवर ब्लॅकमेलिंगचे आरोप करत त्यांच्या भांडाफोडीची घोषणा केल्यानंतरही गणेश जेवरे यांनी पत्रकारांनी केलेल्या ब्लॅकमेलिंगबाबत कोणतेही ठोस पुरावे अद्याप सादर केलेले नाहीत. त्यामुळे जेवरे हे पत्रकारांचा पर्दाफाश कधी करणार ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

जेवरे यांनी बातमीतून पत्रकारांवरच गंभीर आक्षेप घेतल्याने तालुक्यात मोठी खळबळ झाली होती. पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या पत्रकारांबाबत जनतेतून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र आरोप केल्यानंतर जेवरे यांनी कोणतेही ठोस पुरावे अद्यापपर्यंत दिले नाहीत. या आरोपांमुळे पत्रकारितेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचलेला असल्याने किरण जगताप यांच्याकडून पत्रकार गणेश जेवरे यांना पत्रकारांचा भांडाफोड कधी करणार ? हा जाब विचारला जात आहे. पत्रकार गणेश जेवरे हे पुढील काळात काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेवरे यांच्या भूमिकेनंतर पत्रकारांकडून त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल.

उर्वरित पुढील भागात…