
कर्जत तालुक्यातील बेलवंडी येथील महेश दत्तात्रेय राक्षे यांनी त्यांचे चुलते संजय पोपट राक्षे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. तू आमच्या कार्यक्रमांमध्ये का येत नाही. तू एवढा मोठा झाला का ? असे म्हणत त्यांनी महेश राक्षे यांना २२ जानेवारी रोजी सकाळी अडवून ऊसाने मारहाण केल्याचा आरोप महेश राक्षे यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी कर्जत पोलिसात तक्रार दिली आहे. चुलते हे नेहमीच कटकारस्थान करतात. गुंडगिरी क्षेत्रातील लोकांना सांगून तुला जीवे मारायला लावीन अशी धमकीही ते देत असल्याचे, महेश राक्षे यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलीस प्रशासन तक्रारीची दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी अशी मागणी महेश राक्षे यांनी केली आहे.