डॉ. कुमार सप्तर्षी यांना ‘बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

कर्जत : प्रा. किरण जगताप

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना २०२५ चा ‘बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला. बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे हा पुरस्कार दिला जातो. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विकास आमटे यांनी ही माहिती दिली आहे.

९ फेब्रुवारी रोजी कोथरूड येथील गांधी स्मारक निधी सभागृह येथे हा वितरण सोहळा होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सप्तर्षी यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक दशके कार्य केले आहे. सध्या ते ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ या संस्थेचे अध्यक्ष असून ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे संपादक आहेत. तसेच ते भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.