
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी कर्जत पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या ग्राउंडजवळ अवैध पिस्टल व कारतूस बाळगणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील विकास दत्तू सकट याच्याविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल किरण संजय बोराडे यांनी भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम २५ (३) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास वाजता दादा पाटील महाविद्यालयाच्या ग्राउंडवर संशयास्पद वर्तन करणाऱ्या विकास दत्तू सकट याच्या कमरेला काळ्या ग्रिपसह लोखंडी पिस्टल आढळली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे पिस्टल व ६ हजार रुपये किमतीचे तीन जिवंत कारतूस जप्त केले. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस अधिक तपास करत आहेत.