कर्जतमधील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या तत्पर सेवेमुळे रुग्णाला मिळाले जीवनदान !

कर्जत : प्रा. किरण जगताप

अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचा कणा ठरत असलेल्या कर्जत येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेत गंभीर अवस्थेतील रुग्णाला नवजीवन दिले. अतिदक्षता उपचार व तातडीच्या वैद्यकीय सेवेमुळे रुग्णाचा जीव वाचला.

कीटकनाशक सेवन केल्यामुळे गंभीर परिस्थितीत दाखल करण्यात आलेल्या गोकुळ हरिदास बनकर, वय ३६, रा. मिरजगाव यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. योग्य निदान, तात्काळ उपचार आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांची प्रकृती सुधारली. अल्प खर्चात उपचार मिळाल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कर्जत येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे आरोग्यसेवेचा मुख्य आधार बनले आहे. येथे संधिवात, ऑपरेशन, डायबेटीस, बीपी, दमा, हृदयरोग, पॅरालीसिस, सर्पदंश, बालरोग, एनआयसीयू तसेच स्त्रीरोगांसाठी अद्ययावत उपचार सुविधा उपलब्ध आहेत.

डॉ. अक्षय गोरे (सर्जन), डॉ. सुरेश भा. जाधव (एमबीबीएस, डी.एन.बी.), डॉ. मधुकर शांतीलाल कोपनर (एम.एस. स्त्रीरोग), डॉ. निखिल बापूसाहेब नेटके (एम.डी.), डॉ. आशिष चं. चौधरी (एम.डी. बालरोग), डॉ. मयूर बापूसाहेब नेटके (एमबीबीएस), डॉ. मृणालिनी जाधव (बीएएमएस), डॉ. योजना कोपनर (बीएएमएस, डीजीओ), डॉ. अंकिता नेटके (बीएएमएस), डॉ. जागृती चौधरी (फिजिओथेरपिस्ट) यांनी अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना आरोग्यसंपन्न जीवन दिले आहे. हॉस्पिटलच्या सेवेमुळे परिसरातील नागरिकात समाधान आणि विश्वास वाढत आहे.