
खोदकाम करताना जिलेटिनचा अचानक स्फोट होऊन झालेल्या अपघातात कर्जत तालुक्यातील चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

कर्जत – थेरवडी मार्गालगत कुकडी कॅनल पट्टीजवळ खोदकाम सुरू होते. काम सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी जिलेटिनचा अचानक स्फोट झाला. चौघेही त्याच कामात असल्याने या स्फोटात ते गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी धावत जाऊन मदतकार्य केले. सर्वांना बाहेर काढण्यात आले.

मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून जखमींना अहिल्यानगर येथे उपचारासाठी नेण्यात आले. जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. चौघेही अत्यंत गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
खोदकाम करताना झालेल्या अपघातातील लोक हे अत्यवस्थ होते. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवण्याचे मोठे आव्हान होते. ३२ मिनिटांमध्ये हे अंतर कापून रुग्णांना सुरक्षितपणे अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये पोहोचवले असल्याची प्रतिक्रिया रुग्णवाहिका चालक मेहराज पठाण यांनी ‘कर्जत लाईव्ह’शी बोलताना दिली.