शिवजयंतीनिमित्त कर्जत लाईव्ह आयोजित तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल

कर्जत : प्रा. किरण जगताप

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रा. किरण जगताप संपादित ‘कर्जत लाईव्ह’च्या वतीने तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्जत तालुक्यातील विद्यालयांमध्ये आठवी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण शिक्षिका निलम देवरे यांनी केले.

या स्पर्धेचा निकाल असा : अनुराधा रामचंद्र वाळुंज ( सौ. सो. ना. सोनमाळी कन्या विद्या मंदिर, कर्जत ), द्वितीय : वैष्णवी प्रवीण भोसले ( डी. बी. काकडे विद्यालय, पाटेवाडी ), तृतीय : प्रिती किशोरसिंग परदेशी (न्यू इंग्लिश स्कूल, कोरेगाव )

या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना लवकरच कर्जत तालुक्यातील खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रशस्तीपत्रके वितरित केली जाणार आहेत. स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ‘कर्जत लाईव्ह’ची प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात येणार आहेत. ‘कर्जत लाईव्ह’चे प्रतिनिधी राहुल अडसूळ तसेच वैभव पवार यांनी स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन ! कर्जत लाईव्ह टीम