आजारी पडल्यावर वेळ निघून गेली असे होऊ नये : महेंद्र बागल

कर्जत : प्रा. किरण जगताप

भारतात आरोग्य विम्याचा स्वीकार अत्यंत कमी आहे. केवळ ५% भारतीयांकडे आरोग्य विमा असल्याचे समोर आले आहे. यामुळे मोठ्या आजारांवर किंवा अपघातांनंतर उपचारासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर उपचारासाठी मोठा खर्च अपेक्षित असतो. अशावेळी रुग्णाच्या कुटुंबियांना विचारले जाते, “आरोग्य विमा आहे का?” मात्र, अनेक वेळा उत्तर नकारार्थी असते. परिणामी, कुटुंबियांना नातेवाईकांकडे मदतीसाठी धाव घ्यावी लागते, त्यामुळे नागरिकांनी विम्याचे कवच घ्यावे असे आवाहन कर्जत येथील विमा सल्लागार महेंद्र बागल यांनी म्हटले आहे.

बागल पुढे म्हणाले, विमा नसल्याने अनेक कुटुंबांना कर्ज, गहाणखत, दागिन्यांची विक्री आणि इतर मार्गांनी पैसे जमवावे लागतात. वेळेवर योग्य निर्णय घेतला नसल्यास मोठे आर्थिक संकट ओढवू शकते. आरोग्य विमा घेण्याबाबत अनेकजण उदासीन असतात. मात्र, आजारपण आल्यानंतर विमा घेण्याची संधी हुकलेली असते. “हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर आरोग्य विमा घेता येत नाही,” हे नागरिकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

महागड्या वैद्यकीय उपचारांच्या काळात आरोग्य विमा असणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यातील आर्थिक संकट टाळण्यासाठी आणि नातेवाईकांवर आर्थिक भार न टाकण्यासाठी प्रत्येकाने वेळेत आरोग्य विमा घेणे गरजेचे आहे. आरोग्य विमा हा केवळ गरज नसून एक महत्त्वाची गुंतवणूक आहे.

आरोग्य विमा नसल्याने अनेक कुटुंबांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. यासाठी नागरिकांनी आजच आरोग्य विमा घेण्याचा निर्णय घ्यावा आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आवश्यक पाऊल उचलावे, असेही बागल यांनी म्हटले आहे.