
कर्जत येथील कुळधरण रोड येथे संचालक सुनिल ढिसले यांच्या ‘आर्यन इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर’ या नूतन व्यवसायाच्या भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.

या दुकानात सर्व प्रकारचे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स आणि भांडी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्राहकांना सोयीस्कर खरेदी करता येणार असून, या सुविधेचा त्यांना पूर्ण लाभ घेता येईल.
या व्यवसायाचे उद्घाटन मुंजाजी ढिसले, उद्योजक मेघराज बजाज, श्रीमंत शेळके आणि पै. श्यामभाऊ कानगुडे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी ‘आर्यन’ व्यवसायाचे संचालक सुनिल ढिसले, प्रकाश मत्रे आणि किरण शेळके यांनी उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी