
कर्जत तालुक्यातील कर्जत- नगर रोड येथील चांदे बुद्रुक चौक येथे मेजर विजय सूर्यवंशी यांच्या जगदंबा ट्रेडर्स अँड हार्डवेअर या नूतन व्यवसायाचा भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन आज मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.

या दुकानात हार्डवेअरचे सर्व साहित्य उपलब्ध असणार आहेत. सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील, पत्रे, सिमेंट, सर्व प्रकारचे चॅनल आणि अँगल तसेच प्लंबिंग मटेरियल उपलब्ध असणार आहे त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्राहकांना सोयीस्कर खरेदी करता येणार असून या सुविधेचा त्यांना पूर्ण लाभ घेता येईल.
या व्यवसायाचे उद्घाटन सूर्यवंशी परिवार आणि पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव यांच्या उपस्थित होणार आहे. मेजर विजय सूर्यवंशी आणि सूर्यवंशी परिवाराने उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी