
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतात. या अंतर्गत मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दिव्यांग गटातील विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेश दिला जातो. यासाठी लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासण्यासाठी तालुकास्तरीय समिती काम करते.

कर्जत तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी समितीकडून एकूण १२७ पात्र विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली. तालुक्यातील १७ शाळांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना आरटीई कायद्यानुसार मोफत प्रवेश दिले जाणार आहेत.
या समितीच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी प्रदीप शिंदे होते, तर विस्तार अधिकारी व सचिव दशरथ धादवड यांनी समन्वय साधला. पडताळणी समितीमध्ये राजू राऊत, शांताराम दिवेकर, सुरेश गदादे, सचिन अनारसे, रामनाथ होंडे, किरण जगताप, अजिनाथ भोंडवे, महादेव सायकर, अजय सोनवणे, दिपाली तोरडमल, गणेश साळुंके, सुनील सांगळे, दीपक भोसले व आदींचा समावेश होता.
गटशिक्षणाधिकारी प्रदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ गोपाळघरे, हनुमंत होले आणि विजय रांधवन यांनी या बैठकीचे आयोजन व नियोजन केले.