एचपी माऊली पेट्रो स्टेशनला एक महिना पूर्ण ; २.१० कोटींची उलाढाल

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत येथील राशीन रोडलगत दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सुरू करण्यात आलेल्या माऊली पेट्रो स्टेशनला आज एक महिना पूर्ण झाला आहे. माऊली पेट्रो स्टेशनचे संचालक अक्षय राऊत यांनी या एक महिन्यात ग्राहकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व ग्राहकांचे आभार मानले आहेत.

माऊली पेट्रो स्टेशनमध्ये पेट्रोल व डिझेल खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एचपी पेमेंट अ‍ॅपद्वारे पेमेंट केल्यास प्रति १०० रुपयांवर ३ रुपये कॅशबॅक मिळत आहे. तसेच, इतर पंपांच्या तुलनेत प्रति लीटर २५ ते ५० पैशांची सूट दिली जात आहे. यामुळे ग्राहकांना प्रति लीटर ३ रुपये २५ पैसे ते ३ रुपये ५० पैसे पर्यंतचा थेट फायदा होत आहे. शिवाय, एचपीचे दर्जेदार व शुद्ध इंधन दिले जात असल्याने चांगल्या मायलेजची हमीही मिळत आहे.

या पेट्रोल पंपावर २४ तास सेवा उपलब्ध असून सर्व प्रकारच्या डीटीपी कार्ड आणि डिजिटल पेमेंट सेवा स्वीकारल्या जातात. तसेच, ग्राहकांसाठी मोफत नायट्रोजन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधांचा कर्जत तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत.

– राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी