
व्यवसाय आणि क्षेत्र कोणतेही असो त्यात कठोर परिश्रम व प्रामाणिक मेहनत केल्यास त्याची भरभराट- प्रगती निश्चित होते. ग्राहक हा राजा असतो. त्याचे समाधान त्या व्यावसायिकाचे ध्येय असते. जो हा मूलमंत्र आत्मसात करतो तो यशाच्या सर्वोच्च स्थानावर जातो असे प्रतिपादन हभप माऊली महाराज पठाडे यांनी केले. ते कर्जत येथील ‘द लुकस फॅमिली सलून अँड ॲकडमी’ नूतन दुकानाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते बाळासाहेब साळुंके, शिवताराचे संचालक नंदकुमार लांगोरे, नगरसेवक अमृत काळदाते, माजी नगरसेविका मनिषा सोनमाळी, विश्वनाथ काशिद आदी उपस्थित होते.

कर्जत शहरातील बेलेकर कॉलनी येथे चैतन्य क्षीरसागर संचलित ‘द लुकस फॅमिली सलून अँड ॲकडमी’चे भव्य उदघाटन हभप माऊली महाराज पठाडे यांच्या हस्ते शनिवार, दि. १ मार्च रोजी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाले. या प्रसंगी अनेक वक्त्यांनी शुभेच्छा दिल्या.
उदघाटन सोहळ्यास कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. अफरोजखान पठाण, अनिल गदादे, चंद्रकांत सुरवसे, मुख्याध्यापिका सविता बळे, संतोष काळे, सतीश समुद्र, राजू मुळे, राजेंद्र पठाडे, रामकृष्ण शेटे, दशरथ देशमुख, अशोक नेवसे, कैलास सुपेकर, इंजिनियर दादा बेद्रे, गणेश तोरडमल, सविता मेहेत्रे, शरद मेहत्रे, सुनील क्षीरसागर आदी उपस्थित होते. कैलास क्षीरसागर आणि साईनाथ क्षीरसागर यांनी आभार मानले.