कोरेगावच्या कृष्णा शेळके यांची महसूल सहाय्यकपदी निवड

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील शहाजी शेळके यांचे चिरंजीव कृष्णा शेळके यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे.

कृष्णा शेळके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा कर्जतमध्ये राजेंद्र गुंड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अशोक जायभाय, काकासाहेब धांडे, बबन नेवसे, इकबाल काझी, शहाजी शेळके उपस्थित होते.

कर्जत तालुक्यामध्ये कृष्णा शेळके यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. शहाजी शेळके यांच्या सर्व मित्रमंडळींकडून अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे. ही निवड झाल्यामुळे कोरेगावमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कोरेगावमध्येही त्यांचे ठिकठिकाणी सत्कार केले जात आहेत. कृष्णा शेळके हे कोरेगावची शान झाले आहेत.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी