
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे चैतन्यनाथ हॉस्पिटल व प्रसूतीगृह साईलीला मुळव्याध व भगंदर उपचार केंद्र आणि ओम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. संतोष बोरुडे यांच्या ओम हॉस्पिटल येथे मुळव्याध मुक्त अभियान शिबिर बुधवार दि. १२ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ ते ३.३० या वेळेत होणार आहे.

या शिबिरामध्ये आधुनिक लेझर उपचार फक्त १० हजार रुपयात केले जाणार आहे. आधुनिक लेझर उपचार पद्धती वेदनारहित आणि जलद बरे होण्याची प्रक्रिया आहे. या शिबिरामध्ये स्त्रियांचे मुळव्याध व भगंदर तज्ञ डॉ. वनिता शिंदे आणि मुळव्याध व भगंदर तज्ञ संजय शिंदे डॉक्टर्स येणार आहेत.
या शिबिरामध्ये सर्व गरजू रुग्णांनी उपस्थित राहून या उपचार सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर संतोष बोरुडे यांनी केले आहे. या शिबिराचे ठिकाण ओम हॉस्पिटल, बस स्टँडजवळ, नगर सोलापूर रोड, मिरजगाव. अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क करा : ९९७५१५०९९६, ९८५०५७३४५६
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी