कापरेवाडीत ८० फुट उंचीचा भगवा झेंडा उभारून ‘छावा’ दाखवणार : कापरे

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर महिला दिनानिमित्त शनिवार दि. ८ मार्च २०२५ रोजी ॲड. योगेश कापरे पाटील यांच्या वतीने ८० फूट उंचीचा भगवा झेंडा उभारणार आहेत. त्यानंतर लगेच रात्री ८.३० वाजता छावा चित्रपटचे भव्य दिव्य अशा स्वरूपात मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कापरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य ॲड. योगेश कापरे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

कापरे यांनी पुढे म्हटले आहे, हा चित्रपट दहा बाय वीस फुटांच्या एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे. कापरेवाडी येथील ग्रामस्थांना मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक चित्रपट पाहण्याचा आनंद मिळणार आहे. हा कार्यक्रम गावातील सर्व नागरिक विशेषतः महिला आणि मुलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट ऐतिहासिक आणि प्रेरणादायी असून नव्या पिढीपर्यंत त्यांच्या पराक्रमाची गाथा पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

या अनोख्या चित्रपट सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कापरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य ॲड. योगेश कापरे पाटील व कापरे परिवार, भैरवनाथ युवा प्रतिष्ठान आणि शिवराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

– राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी