अध्यात्माची कास धरून गोसेवा करा : हभप पुरुषोत्तम महाराज पाटील

कर्जत : प्रा. किरण जगताप

जन्माला आलेला प्रत्येक जीव मरणारच आहे. आपण जिवंत आहोत, हेच खरे आश्चर्य आहे. परमार्थ म्हणजे केवळ कीर्तनकारांची घरे चालवण्यासाठी नाही, तर तो प्रबोधन करण्यासाठी आहे. उत्तम कार्य करा, जेणेकरून आपल्या कर्तृत्वाची कीर्ती मागे राहील. ज्या ठिकाणी विज्ञान थांबते, तेथे आध्यात्म सुरू होते. जो जन्माला आला आहे, तो जाणारच आहे. त्यामुळे प्रत्येकाने अध्यात्माची कास धरावी आणि गोसेवा करावी, असे आवाहन हभप पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणाकर यांनी केले.

कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथे कै. हनुमंतराव शहाजीराव तनपुरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त फुलाच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना हभप पाटील पुढे म्हणाले, माणसाने जीवनात संसाराबरोबरच परमार्थाचा विचार करावा. जसे आपण शिक्षण, घर, लग्न आणि इतर गोष्टींसाठी नियोजन करतो, तसेच परमार्थ करत मरणाचीही तयारी करावी. भगवंतावर विश्वास ठेवा. कोरोनाच्या काळात अनेक चांगली माणसे आपल्यातून निघून गेली. इतिहास पाहिला, तर समाजोपयोगी लोकांचे आयुष्य कमी असते. त्यामुळे गोमातेची सेवा करा, आई-वडिलांचा सन्मान व सांभाळ करा. त्यामुळे काहीही कमी पडणार नाही, असेही ते म्हणाले.

कै. हनुमंतराव तनपुरे यांच्या वारसांनी पुण्यस्मरणानिमित्त भागवत कथेचे आणि फुलाच्या कीर्तनाचे उत्कृष्ट आयोजन केले. यासाठी महेश तनपुरे, डॉ. नितीन तनपुरे, पुष्पा महाडीक, अश्लेषा गुंडेकर या भावंडांचे आणि प्रवीदादा घुले पाटील मित्रमंडळाचे कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाला विविध धार्मिक, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, भाजपाचे युवा नेते प्रविण घुले, बाळासाहेब साळुंके, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी उपसभापती राजेंद्र गुंड, अशोकराव खेडकर, कर्जत- जामखेड युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले, हभप रवींद्र महाराज सुद्रिक, युवक नेते दादासाहेब सोनमाळी, माजी पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे, बप्पाजी धांडे, कोरेगावचे माजी सरपंच शिवाजीराव फाळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीहर्ष शेवाळे, दूध संघाचे संचालक बाळासाहेब निंबाळकर, अनिल गदादे, शहाजीराजे भोसले, तात्यासाहेब ढेरे, माजी जिल्हा परिषद सदस्या मोहीनीताई घुले, उपनगराध्यक्षा रोहीनी सचिन घुले, सावता परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मनिषा सोनमाळी आदींचा समावेश होता.

सूत्रसंचालन दादा शिंदे यांनी केले. प्रविणदादा घुले यांनी आभार मानले.