
कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील आनंदराव महादेव कदम यांचे चिरंजीव आकाश आनंदराव कदम यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या जलसंपदा विभाग परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार समारंभ करण्याचे योजिले आहे अशी माहिती कापरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य ॲड. योगेश कापरे पाटील यांनी दिली.
हा भव्य नागरी सत्कार समारंभ सोमवार दि. १० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत कापरेवाडी येथे होणार आहे. आकाश कदम यांची निवड झाल्याबद्दल कापरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य ॲड. योगेश कापरे पाटील यांनी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आकाश कदम हे कापरेवाडीचे शान झाले आहेत.
या भव्य नागरी सत्कार समारंभासाठी कापरेवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कापरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य, शुभ यश उद्योग समूहाचे संचालक ॲड. योगेश कापरे पाटील व सर्व कापरे मित्र परिवाराने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी
