
कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी कदीर तय्यब सय्यद (वय ६२) यांचे दि. ९ मार्च २०२५ रोजी डी वाय पाटील हॉस्पिटल, पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने व्यापारी व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘एस कदीर टेलर्स’ या नावाने ते कर्जत तालुक्यात परिचित होते. शांत, मनमिळाऊ स्वभाव आणि सामाजिक जाणीव ठेवत व्यवसाय करणारे कदीर सय्यद यांनी मोठा मित्रपरिवार कमावला होता. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

त्यांच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व वारकरी संप्रदाय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
