
कर्जत तालुक्यातील कुळधरण रोड येथे डॉ. निंबाळकर यांच्या ओम साई हॉस्पिटल आणि विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बाल हृदयरोग शिबिर मंगळवार दि. १८ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.

या शिबिरामध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे. यामध्ये हृदयाला छिद्र असणे, छिद्र डिवाइसच्या सहाय्याने बंद करणे आणि सर्व प्रकारच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तसेच गरजू रुग्णांना मोफत विशेषतज्ज्ञांचा सल्ला दिला जाणार आहे, मोफत ईसीजी सेवा दिली जाणार आहे आणि मोफत २ डी इकोकार्डिओग्राफी केली जाणार आहे.

या शिबिरामध्ये विशेषत: जन्मदात हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. या शिबिरामध्ये विश्वराज हॉस्पिटल येथील बालहृदयरोग तज्ञ डॉ. आशिष बनपूरकर आणि ओम साई हॉस्पिटल येथील नवजात शिशु व बालरोग तज्ञ डॉ. चेतन महादेव निंबाळकर येणार आहेत.


या शिबिरामध्ये सर्व गरजू रुग्णांनी उपस्थित राहून या उपचार सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिराचे ठिकाण प्लॉट नंबर ८, कुळधरण रोड, कर्जत हे आहे. अधिक माहितीसाठी ८२८२८२६२५९, ९५४५१६३३२५ या नंबर वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी